वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य परिसरात सध्या विदेशी ग्लिरिसिडिया सेपियम या झाडाला आकर्षक गुलाबी-पांढऱ्या फुलांचा बहर आला असून रस्त्याच्या कडेला फुललेल्या या झाडांनी प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. निसर्गरम्य वातावरणात फुलांचा साज चढल्याने परिसर अधिकच मोहक दिसू लागला आहे.