अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील किन्ही येथे तिसरा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. किन्ही गावात एका वयोवृध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको करून किन्ही परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. वन विभागाने लावल्या पिंजऱ्यात लागोपाठ तिसरा बिबट्या अडकला आहे.