सातारा - साताऱ्यात छत्रपती प्रतापसिंह महाराज राजवाडा, येथे ‘छत्रपती महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शंभूराजे जयंती १४ मे ते छत्रपती शाहू महाराज जयंती १८ मे या कालावधीनिमित्त हा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला असून आज १७ मे रोजी छत्रपती प्रतापसिंह महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. हा सोहळा श्रीमंत छत्रपती वृशालीराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला.सायंकाळी मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासावर प्रसिद्ध इतिहासकार तथा भा. इ. सं. मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.या महोत्सवाचे आयोजन श्री छत्रपती शंभूराज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.