महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर उद्या शुक्रवारी ८ मे रोजी लागणार आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल लाईव्ह टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर देखील तुम्ही पाहू शकता. तसेच हा निकाल सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरही पाहाता येणार आहे. https://results.digilocker.gov.in तसेच https://mahahsscboard.in आणि https://sscresult.mkcl.org आणि https://results.navneet.com या संकेत स्थळांवरही पहाता येणार आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार उद्या दुपारी एक वाजता सर्व विभागीय मंडळाचा निकाल एकाचवेळी जाहीर केला जाणार आहे.