सध्या तापमानाचा पारा39 अंशावर गेले असून दिवसेंदिवस पारा वाढू लागल्याने ग्रामीण भागात थंड पाण्यासाठी पारंपरिक माठ (डेरा) यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 'गरीबांचा फ्रिज' म्हणून ओळखला जाणारा माठ कमी खर्चात नैसर्गिकरीत्या पाणी थंड ठेवत असल्याने नागरिकांचा त्याकडे पुन्हा ओढा वाढतांनाचे दिसत आहे.