जालन्यातील समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर डिझेल साठा संपला आहे.त्यामुळं डिझेल अभावी पेट्रोल पंपासमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.तर आज रात्रीपर्यंत डिझेल येईल अशी माहिती पंप मॅनेजरने दिली आहे.समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावरील डिझेल संपल्याने वाहनचालकांचे हाल होत असून प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.