शहादा शहरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिवाजी महाराज स्मारक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या प्रमुख मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.