विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातून हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय यांची दिंडी आज प्रस्थान झाल आहे. राज्यातील मानाच्या दिंड्यांपैकी नवव्या क्रमांकाची असलेली ही दिंडी गेल्या अनेक वर्षांपासून आपली परंपरा जपत आहे. निळोबारायांच्या दिंडीमध्ये पन्नास ते साठ हजार वारकरी सहभागी होतात.