चिपळूण तालुक्यातील शिरगाव परिसरातून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी आज मनमोहक रूप धारण केले आहे. कुंभार्ली घाट परिसरात दाट काळे ढग आणि हिरवाईने नटलेल्या पर्वतरांगांमुळे निसर्गाचे विलक्षण सौंदर्य खुलून दिसत आहे.