शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मथुरा नगर परिसरातील रहिवासी कल्याणसिंग राजपूत यांची युनिकॉर्न मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास घरासमोरून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.