इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे.राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेला राज्याच्या राज्याच्या बाहेरून देखील भाविक भक्त श्री बाबीर देवाच्या दर्शनास गर्दी करत असतात. तसेच या ठिकाणी 'गजढोल नृत्य स्पर्धा' मोठ्या उत्साहात भरवली जाते. या स्पर्धेमध्ये लहान मुले-मुली देखील सहभागी झाले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.