सातपुड्यातील दुर्गम भागातील प्रसिद्ध गावरान आंब्याला यंदा बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातपुडा पट्ट्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.हवामानातील या बदलामुळे आंब्याच्या झाडांवर करपा आणि भुरी सारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.