कोकणचा राजा हापूस आंब्याची पहिली पेटी हंगामापूर्वीच वाशी मार्केटमध्ये रवाना झाली आहे. देवगडच्या गिर्ये येथील रामेश्वर येथील प्रगतशील बागायतदार निलेश बांदकर यांनी ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याचे उत्पादन घेत नवा प्रयोग यशस्वी केला आहे.