डोंबिवली पलावा सिटीमध्ये पार पडलेल्या राज्यातील पहिल्याच पॅरा स्टेट रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेने क्रीडा इतिहासात नवे सुवर्णपान जोडले असून, खेळाडूंच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला सलाम ठोकला जात आहे.या ऐतिहासिक स्पर्धेत महाराष्ट्रातील ९ विविध जिल्ह्यांमधून तब्बल ३५ पॅरा खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विविध शारीरिक आव्हानांवर मात करत खेळाडूंनी टेबल टेनिसच्या मैदानावर आपली कौशल्ये सादर केली.