संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा माऊली तुकाराम"च्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान केले...माऊलींच्या कर्मभूमीत पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांचे पहिला रिंगण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत नेवासा बस स्थानक येथे उत्साही वातावरणात पार पडला.