विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून गोंदिया जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.