गुडीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाची सुरुवात या निमित्त गोंदिया शहरातील सिव्हिल हनुमान मंदिरासमोर 15 फूट उंच गुडी उभारण्यात आली, तर यावेळी मराठी संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सकल हिंदू समाजाच्यावतीने रॅली काढून हिंदू नव वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत अनेक देखावे सादर केले गेले. शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. आणि डीजे तसेच ढोल ताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली.