चंद्रपूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला सार्वजनिक गणपती म्हणजे चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ. चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जटपुरा गेटच्या लगत या गणपतीची स्थापना केली जाते. दरवर्षी 21 फुटी आकर्षक मूर्ती व त्याची लक्षवेधी सजावट चंद्रपूरकरांसाठी आकर्षण ठरते.