शहापूर तालुक्यातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे समाधी स्थळ उंभ्रई येथे आहे, हे समाधी स्थळ अतिशय जिर्ण झालेले असून या समाधी स्थळाला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी बिरसा मुंडा जनजाती गौरवा निमित्त भेट दिली. या समाधी स्थळाला 'क' दर्जाचा पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच गेले कित्येक वर्षे उपेक्षित असलेले हे समाधीस्थळ ठाणे जिल्ह्यातील कॉफी बुक राईटमध्ये घेण्याचे आश्वासन दिले आहे.