नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढत असून किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या घसरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे संपूर्ण तालुका गारठून गेला असून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.