सातारा : महाबळेश्वर नगरपालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे निवडून आल्यानंतर जल्लोष करण्यात आला. महाबळेश्वरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करीत गुलालाची उधळण केली आणि सुनील शिंदे यांची मिरवणूक काढली आहे.