आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम मोबाईलच्या किमतींवर देखील झाला असून तब्बल 40 टक्क्यांनी मोबाईलच्या किमती वाढल्या आहेत. जगभराबरोबरच देशात, राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात देखील मोबाईलच्या किमती वाढल्याचा पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावर वाढलेला भू-राजकीय तणाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि विशेषतः मेमरी चिप्सच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे मोबाईलच्या किमतीत वाढ झाली आहे.