जळगावात गांधीनगरमध्ये होलसेल औषधी विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत साधारण पाच लाखांच्या औषधी व साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली, व दुकानातील फ्रीजसह इतर वस्तूंमुळे आग पसरली अशी माहिती मिळाली आहे. दुकान बंद करून दुकानाचे मालक चहा पिण्यासाठी बाहेर गेले आणि तेवढ्यात ही दुर्घटना घडली. याच परिसरात घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर भाजपच्या खासदार स्मीता वाघ राहतात. त्यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देत पाहणी केली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप करून आग नियंत्रणात आणली.