शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव शहरात दाखल झाली. धाराशिव शहरात पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे संपूर्ण धाराशिव शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.