उन्हाचा तडाका दिवसेंदिवस तीव्र होत असून याचा परिणाम थेट शेतीवर दिसून येत आहे. विशेषतः पेरू उत्पादक शेतकरी या वाढत्या तापमानामुळे चिंतेत होते. मात्र, या परिस्थितीवर मात करण्यासाठी येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील दत्तू ढोकळे या शेतकऱ्यांने आधुनिक उपायाचे अवलंब केला आहे.