पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील ग्रामदैवत वेताळबाबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ढोल-ताशा, हालगी अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत "वेताळ बाबाच्या नावानं चांगभलं", "देवाच्या घोड्याचं चांगभलं" अशा जयघोषात गुलालाची उधळण करत घोड्यावर स्वार अशा वेताळ देवाची ग्राम प्रदक्षिना करण्यात आली.