नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. रात्रभरापासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून, शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.