पंढरपूर येथील पालखींचा परतीचा प्रवास सुरू आहे. पालखीच्या परतीच्या प्रवासादरम्यान प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या परभणीच्या दैठणा येथे कामिका एकादशी निमित्ताने ठाकूर बुवा तसेच धीरजगिर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यासाठी दोन लाखांपेक्षा अधिक भाविक दैठणा येथे येतात. दैठणा येथील परतीच्या वारीला 350 वर्षाची परंपरा आहे. वारीच्या परतीच्या सोहळ्याला मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावली असून, येणाऱ्या दिवसात या भागाचा विकास करणार असे आश्वासन यावेळी मेघना बोर्डीकर यांनी दिले आहे.