इचलकरंजी महानगरपालिकेच्या गलथानपणाचा फटका आता थेट शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. जुना चंदूर रोड, दुर्गामाता चौक, ज्ञानगंगा नगर येथील न्यू व्हिजन विद्या मंदिर परिसरात ड्रेनेज पाइपलाइनसाठी खोदलेला रस्ता महिन्यांपासून पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने संपूर्ण परिसर चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्याने व्यापला आहे. यामुळे शेकडो विद्यार्थी दररोज खड्डयात साचलेल्या पाण्यातून जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करीत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी अभिनव पद्धतीने चिखलाच्या पाण्यात होड्या सोडुन आंदोलन केले.