राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्या प्रांगणात एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. काही वर्षांपूर्वी अजित पवार यांनी स्वतः लावलेली झाडे आज दिमाखात उभी आहेत. त्या झाडांच्या छायेत आज सुनेत्रा पवार उभ्या असल्याचे दृश्य अनेकांना भावूक करून गेले.