अकोला शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतरांगांचे आज अकोला शहरातून स्पष्ट दर्शन घडले असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेला पाऊस आणि ढगाळ तसेच स्वच्छ वातावरण यामुळे हा दुर्मीळ नजारा पाहायला मिळाला आहे.