तब्बल दोन हजार वर्षांपेक्षा अधिक पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या धाराशिवच्या तेर येथील प्राचीन तीर्थकुंडासाठी तीन कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी या तीर्थकुंडाच्या जतन आणि संवर्धनासाठी एक कोटी 64 लाख रुपये उपलब्ध झालेले आहेत.