आदिशक्तीच्या आराधनेचा सण म्हणजेच शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होतेय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरगडावर भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. गावा गावात नवरात्रोत्सवाची स्थापना करण्यासाठी माहूरगडावरून रेणुका ज्योत पेटवून नेण्याची जुनी परंपरा आहे.