सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव येथील ऐतिहासिक भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित ८२ व्या 'हिंदकेसरी' बैलगाडा स्पर्धेत 'मेहरबान आणि शंभू' या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून मैदानाचा मान राखला. कडाक्याच्या उन्हात पार पडलेल्या या स्पर्धेत बैलांना आणि शौकिनांना दिलासा देण्यासाठी ड्रोनद्वारे गुलाबाच्या पाण्याची फवारणी करण्यात आली. आयोजकांचा हा 'हायटेक' प्रयोग यावर्षीच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरला.