सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी येथे रिव्हर्स ट्रॅक्टर शर्यतीचा थरार रंगला. श्रीनाथ देव बाबा यात्रेनिमित्ताने सिद्धेश्वर यात्रा कमिटीकडून या स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.यामध्ये आंधळीसह पंचक्रोशीतील आसपासच्या 20 हुन अधिक ट्रॅक्टर चालकांनी सहभाग घेतला होता,कमी वेळेत आणि ट्रॅक वरून ट्रॅक्टर ट्रॉली सुरळीतपणे घेऊन जाण्याचे आव्हान या ट्रॅक्टर चालकांच्या समोर होते. ट्रॅक्टर चालकांचे कौशल्य वाढवण्यासाठी सिद्धेश्वर यात्रा कमिटी कडून गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, ज्याला ट्रॅक्टर चालकांसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.