डोंगर,दऱ्या,जंगलातही लोकशाही थांबली नाही.पनवेल तालुक्यातील अतिदुर्गम माची प्रबळगड परिसरात प्रशासनाने अक्षरशः डोंगर दऱ्या पार करीत मतदान प्रक्रिया यशस्वी केली.अवघड भौगोलिक परिस्थिती असतानाही निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र गाठत लोकशाहीची जबाबदारी पार पाडली. शांततेत आणि सुरक्षित वातावरणात मतदान पार पडले असून प्रशासनाच्या या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे.