सातारा शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावरावर वेण्णानदीच्या काठी असलेले वाढे गावचे जागृत ग्रामदैवत भैरवनाथ, या वाढेश्वर जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. चैत्र वैद्य पंचीमीला नवस बोललेल्या भक्तांकडून भैरवनाथास आकर्षक वस्त्र परिधान करण्यात आले. यावेळी सूर्यास्त होण्याआधी वाढेश्वर जोगेश्वरीचा विवाह सोहळा पुजारी सेवक वर्ग आणि मानकरी ग्रामस्थ यांच्या हस्ते पार पडला.