येवला नगर परिषदेच्या वतीने शहरात औषध फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे.निवडणुका संपल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील विविध भागात औषध फवारणी करण्यात येत असून नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे.