नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू सिद्धिविनायक गणपती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून दानपेटीतील रोख 25 हजार रुपये व गणपतीची पितळ्याची अभिषेक मूर्ती असा 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरीचा हा थरार सिसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.