कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथे पोलीस ठाण्यापासून अगदी जवळच असलेल्या भालचंद्र ज्वेलरी शाॅपमध्ये चोरीची घटना घडली आहे. चार चोरट्यांच्या टोळक्याने शटर फोडून सुमारे दहा लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रहदारीच्या ठिकाणी ही धाडसी चोरी केल्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.