अभिनेत्रीच्या संगीता बिजलानी हिच्या पवना धरणाजवळ असलेल्या तिकोना पेठ गावातील फार्महाऊसमध्ये चोरी झाल्याची माहिती शुक्रवारी दुपारी समोर आली. अभिनेत्री शनिवारी सकाळी फार्महाऊसवर आली असता फार्महाऊसचा मुख्य दरवाजा तुटलेला, खिडक्यांचे गज तोडण्यात आले होते. फार्महाऊसमध्येही तोडफोड झाली होती. अनेक मौल्यवान वस्तू गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.