परिसरात गेल्या आठ दिवसांत हवामानात अचानक मोठा बदल जाणवत आहे. तापमानाचा पारा थेट ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. काही दिवसांपूर्वी १३ अंशांवर स्थिरावलेले तापमान शनिवारी पहाटे ८.१ अंशांवर पोहोचले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.