थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे १३ एप्रिलनंतर तब्बल महिनाभराने पुन्हा १३ मे रोजी कमाल तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला विशेष म्हणजे गेल्या २५ दिवसांपासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम राहत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत उन्हाच्या तीव्र झळांमुळे अंगाची लाही-लाही होत असून उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत.