पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील सोनवणे वस्तीमध्ये भरदिवसा बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दिवसा अचानक बिबट्या मानवी वस्ती परिसरात दिसून आला. काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच एकच खळबळ उडाली.