विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. काकड आरतीनंतर साई समाधी मंदिरातून साईबाबांची प्रतिमा , विणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक देखील काढण्यात आली. यंदाचे हे साई पुण्यतिथीचे 107 वे वर्ष आहे. साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट तसेच आकर्षक विद्युत सजावट केल्याची देखील मिळत आहे.