नवी मुंबईतील खारघर परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना चोरट्यांनी टार्गेट केलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एक युवक हातगाडी घेऊन येतो आणि नारळ पाणी विक्रेत्याचे नारळ चोरून नेत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक फेरीवाले आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.