जळगावात शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील अख्खं एटीएम मशीन चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांचा एटीएम मशीन चोरून नेतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. चारचाकी गाडीला दोर बांधून एटीएम मशीन उखडून चोरून नेताना चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.