निफाड तालुक्यातील देवगाव येथे आणखी एक बिबट्या जेरबंद झाला आहे. पोलीस पाटील सुनील बोचरे यांच्या गट क्रमांक 412/ 2 मधील उसाच्या शेता जवळ लावलेल्या पिंजऱ्यात हा तिसरा बिबट्या अडकला. बिबट्या पकडल्याची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांच्या हालचाली वाढल्या असून भीतीचं वातावरण निर्माण झाले महिन्याभरात तिसरा बिबट्या पकडला असला तरी परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.