तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. अटल सेतू परिसरात विकसित होणारे हे शहर उरण, पेण, पनवेल तालुक्यांमध्ये असेल. आयटी पार्क, ग्रीन झोन, ६२% खुली जागा ही याची वैशिष्ट्ये आहेत. मुंबईवरील ताण कमी करून शहरीकरण, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा मुख्य उद्देश आहे.