सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यातील कन्हेरगावच्या सागर केदार हा तरुण चक्क हाताने आणि डोक्याने नारळ फोडतो. सागर केदार हा टेंभुर्णी मधील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयात बीएच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. या शेतकरी पुत्राच्या अनोख्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.